‘सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना आमच्या जिल्ह्यात येतही नाही’

सिंधुदुर्ग : दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य प्रचंड त्रस्त झाली आहे. यावरुन विरोधक मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहे.

काही दिवसांपूर्वी वाढत्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने याच मुद्द्यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका केली आहे. ‘पेट्रोलचे भाव वाचून ज्याच्या छातीत कळ येणार नाही तो शूरवीर व ज्यास घाम फुटेल तो कमकुवत मनाचा, असा जो प्रकार सध्या आपल्या देशात सुरू आहे तो खतरनाक मनोवृत्तीचा आहे.

लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल, तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा.

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत’, असं म्हणत शिवसेनेने अग्रलेखातून मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, यावर भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. ‘सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

‘सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो? आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणं बरोबर नाही. ‘सामना’ची फार दखल घ्यायचे कारण नाही’, असेही पडळकर यांनी म्हंटलय.

तुम्ही टीव्हीवर दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्त्वात आहे, हे लोकांना कळते. अन्यथा आमच्या जिल्ह्यात कोणी सामना वाचतही नाही, अशी खिल्ली पडळकर यांनी उडवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या