मी प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड केली नाही -नितीशकुमार

पाटणा : सृजन घोटाळा प्रकरण मी स्वतः जनतेपुढे उघड केले आहे. मी आय़ुष्यभर प्रामाणिकपणे राजकीय वाटचाल केली आहे. इमानदारीशी कधीही तडजोड केली नाही, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले.

संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. माझ्या प्रामाणिकतेमुळेच मला कोणीही विकत घेऊ शकलेले नाही , असे ते सृजन घोटाळ्याबाबत झालेल्या आरोपांसंदर्भात बोलताना म्हणाले.

विरोधी पक्ष जे आरोप करत आहेत ते खोटे असून त्यात काही तथ्य नाही . याप्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. बिहारमध्ये आलेल्या पूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नेपाळ आणि बिहारमध्ये 18 जिल्हे पाण्याखाली गेले आणि नागरिकांना या पुराचा फटका बसला. निसर्गाच्या झालेल्या –हासामुळे हे संकट ओढावले असून मंत्री आमदार, खासदार नगरसेवक, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. पूरग्रस्तांना मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.