‘चंद्रकांत पाटील हे आमच्या तीन पक्षांपैकी एका पक्षात येणार असं माझ्या कानावर आलंय’

uddhav thackeray vs chandrakant patil

औरंगाबाद : आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी आणि भावी सहकारी या विधानाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेत त्यांना चिमटा काढला. ‘मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय,’ असं म्हणत पाटील यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते.

याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत,’ असं भाष्य करत ठाकरेंनी स्मितहास्य केले. दरम्यान, त्यांनी ही मिश्किल टिपण्णी केली असली तरी शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या