‘मैं अपने दुश्मनोंका बड़ा एहतराम करता हूँ’, नवाब मलिकांचे खोचक ट्वीट

nawab malik

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज क्रुझवरील ड्रग्ज पार्टी संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या अगोदर त्यांनी एक ट्वीट करत इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्वीटने चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ’ असे ट्वीट मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता ते राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत एनसीबीची पोलखोल करण्यात येणार आहे.

आता या पत्रकार परिषदेत ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपकडून बॉलिवूड तसेच राज्य सरकारची बदनामी केली जात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. आज ते यावरच पत्रकार परिषद घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या