“मैं अपने दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ”; नवाब मलिकांचे सूचक वक्त्यव्य

नवाब मलिक

मुंबई:  क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १८ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना NCB ने सोडले. यातील एक म्हणजे रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

६ ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB चे भाजप कनेक्शन उघड केले होते आणि आज नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा यासंदर्भात नवाब मलिक पत्रकार परिषद घेत काही खुलासे करणार आहेत. मात्र याआधी त्यांनी सूचक ट्वीट केल्याने एकच चर्चा रंगली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत लिहिले की, ‘मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।,’ असं ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, नवाब मलिक आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत एनसीबीबाबत अनेक खुलासे करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या