मला अनेक राजकीय पक्षांचं बोलावणे आहे, मात्र मी कोणत्याही पक्षाला बांधील नाही : गोखले

vikram gokhale

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘मला अनेक राजकीय पक्षांचं बोलावणे आहे, मात्र मी कोणत्याही पक्षाला बांधील नाही’ असं विधान केल आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर मत मांडले.

‘पुलवामा हल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतं मागणे चुकीचं आहे. हल्ल्याचा राजकीय वापर करु नये, चूक होईल’ असं विधान केल आहे. राजकारणावर बोलताना गोखले यांनी “राजकारणसाठी प्रशिक्षण हवं. अमिताभ बच्चन यांनाही याबाबत पश्चाताप झाला आहे. मलाही अनेक राजकीय पक्षांनी बोलवलं मात्र मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. राजकारण व्यवसाय, धंदा झाला आहे”, असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मी आत्मचरीत्र लिहणार नाही. सर्व आत्मचरीत्रे खोटी असतात. आत्मचरीत्र लिहणारा अलिप्त आणि त्रयस्थपणा हवा आहे, मात्र मी एवढा मोठा नाही असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.