Sushama Andhare । “मी माझं बाळ शिवसेनेला दत्तक दिलंय..” ; सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका?

मुंबई : शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे (Sushama andhare) यांनी दावा केला आहे की कालपासून त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळत आहे. मला माझ्या ५ वर्षांच्या  मुलीची काळजी वाटत आहे. म्हणून मी माझं बाळ शिवसेनेला दत्तक देत असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरुवारी सायंकाळी नवी मुंबईत झालेल्या महाप्रबोधन मेळाव्यात त्यांनी हे दावे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महाप्रबोधन यात्रा सुरू केल्यानंतर चार दिवसांनंतर शिवसेनेच्या उद्धव गटाने नवी मुंबईत रॅली काढली. शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दुसरी यात्रा वाशीतील विष्णुदास भावे सभागृहात पार पडली.

“मला बाहेर न जाण्यास सांगण्यात आले आहे. हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. काल मी पुणे विद्यापीठात होते तेव्हा विविध पोलीस कर्मचारी माझ्या संरक्षणासाठी आले होते. माझ्यावर गुन्हा दाखल होण्याची किंवा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन कॉन्स्टेबल माझ्या सोसायटीत आले आणि त्यांनी मला काळजी घेण्यास सांगितले. मी माझ्या पक्षाच्या नेत्याला सांगितले की, जर पोलिसांनी मला संरक्षण दिले नाही तर मला खाजगी सुरक्षा द्या. मला भीती वाटते असे नाही, पण माझी फक्त पाच वर्षांची मुलगी आहे. तिची काळजी मला वाटतं आहे” असं देखील अंधारे म्हणाल्या.

मी आज जाहीरपणे सांगते की, मी माझे बाळ पक्षाने दत्तक घेण्यासाठी दिले आहे. सर्व शिवसैनिक काळजी घेतील आणि आमचे पक्षनेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तिचे कुटुंबप्रमुख असतील, असं सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे सांगितलं. “मला बाळाची चिंता वाटली. मात्र, त्याची जबाबरदारी घ्यायला शिवसैनिक तयार आहेत. त्यांनाच मी माझे बाळ दत्तक दिले आहे. माझ्यावर गुन्हे दाखल केल्याने मी गप्प बसेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा,” असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “मी माझ्या मातृभाषेत बोलले तर त्यांना समजेल का? पंतप्रधानांना प्रश्न करणे चुकीचे आहे का? मी फक्त 2 कोटी वार्षिक नोकर्‍या, त्यांनी वचन दिलेल्या खात्यातील 15 लाख रुपये याबद्दल विचारत होते. यात माझं काय चुकलं असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे (Sushama andhare) यांनी दावा केला आहे की कालपासून त्यांच्या जीवाला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics