माझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील आहे, त्यामुळे माझ्या वाटेला जायचं काही कामचंं नाही – मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. तर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होत. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत आपल्या दोन बहिणी या आपल्या ताकद असल्याच सांगितल आहे.

गोपीनाथ गड याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या, “खासदार प्रीतम मुंडे यांना खासदार म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून जास्त आनंद वाटतो. तर कोणी मला त्रास दिला तर मी लगेच यषु ताई कडे डॉक्युमेंट पाठवते. आणि ती रात्रभर बसून त्याची खबर घेते. माझी एक बहिण डॉक्टर तर दुसरी वकील त्यामुळे माझ्या वाट्याला जाण्याच कामच नाही.” अस म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरवातीलाच सभा जिंकली. पंकजा मुंडे यांच्या एक भगिनी प्रीतम मुंडे या खासदार असून दुसऱ्या भगिनी यशश्री मुंडे या कायद्याच्या अभ्यासक आहेत.

या कार्यक्रमाला आमदार राम शिंदे, खासदार प्रीतम मुंडे, महादेव जानकर, आर.टी देशमुख, संगीता ठोंबरे, गोविंद केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...