fbpx

मला उपराष्ट्रपती व्यंकया नायडूबाबत तक्रार आहे : अमित शहा

amit shah

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकया नायडूबाबत तक्रार केली आहे. व्यंकया नायडू हे राज्यसभेत सत्ताधारी नेत्यांशी खूप सक्तीने वागतात. त्यामुळे मंत्रिमंडळातील अनेक नेते त्यांच्याशी बोलताना घाबरतात, अशी तक्रार अमित शहा यांनी केली. उपाध्यक्षपदाच्या नायडू यांच्या दोन वर्षांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळांवर आधारित ‘लिस्टींग, लर्निंग अँड लीडिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शाह यांनी ही मिश्कील टोलेबाजी केली.

यावेळी अमित शहा यांनी व्यंकया नायडू यांचे कलम 370बाबतचे मत देखील सांगितले. शहा म्हणाले की, नायडू यांचा कलम 370 ला तीव्र विरोध होता. जम्मू-काश्मीरला दिलेला कलम 370 मधील विशेष दर्जा हा देशाच्या हिताचा नव्हता. त्यामुळे कलम 370 हे काढून टाकले पाहिजे असा त्यांचा ठाम निर्धार होता. जो पर्यंत कलम 370 हटवले जात नाही तो पर्यंत काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपणार नाही, असे ते वारंवार म्हणायचे.

दरम्यान उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कलम ३७० ‘ रद्द करणं हा राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विषय आहे असं विधान केले आहे. तसेच ‘कलम ३७०’ रद्द करणं काळाची गरज आहे. आपण सर्वांनी राजकारणाचा नव्हे राष्ट्रहिताचा विचार केला पाहिजे. कलम ३७० हा राजकीय मुद्दा नसून तो राष्ट्रहिताचा मुद्दा आहे कारण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे. तेथे जे काही प्रश्न असतील ते सोडवून काश्मीरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असं विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या