पंकजा मुंडे पराभूत होणार असल्याची कल्पना मी अमित पालवेंना दिली होती : संजय काकडे

sanjay-kakde

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी घेतलेल्या मेळाव्यानंतर भाजप नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यामुळे किंवा वक्तव्याने पक्षाला कोणतंही नुकसान होणार नाही. तसेच पंकजा मुंडे या पराभूत होणार आहेत हे पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांना आधीच सांगितले होते, अशी सडेतोड प्रतिक्रिया भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिली आहे.

एक वृत्तवाहिनीशी बोलताना संजय काकडे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ज्यांना मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार, अशी टीका काकडे यांनी केली होती. पंकजा यांची विधाने भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्याला दुखावणारी आहेत. पाच वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही काम करता आलं नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार, असा काकडे यांनी विचारला.

Loading...

तसेच पंकजा मुंडे यांचा पराभव हा त्यांच्ता कर्तुत्त्वामुळेच झाला. त्यांची जागा धोक्यात आहे, याचा इशारा मी त्यांचे पती अमित पालवे यांच्याकडे दिला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले, असही काकडे म्हणाले. संजय काकडे यांच्या रोखठोक प्रतिक्रियेमुळे चांगलीच चर्चा होत आहे. तर पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी काकडे यांच्या बोलण्यावर आक्षेप घेत पंकजा यांचा एकदा पराभव झाला म्हणून तुम्ही मुंडेच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेता का, असा सवाल केला आहे.

दरम्यान गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त शुक्रवारी भगवानगड येथे पंकजा मुंडे यांनी भव्य मेळावा भरवला होता. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्ष हा माझ्या बापाचा आहे. त्यामुळे मी पक्ष सोडणार नाही. तसेच मी बेईमान नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र याचवेळी पंकजा मुंडे पक्षातीक्ल काही नेत्यांवरची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार