मला शिवसेनेकडून देखील ऑफर – नारायण राणे

narayan rane

कुडाळ : ‘मला शिवसेनेकडूनही ऑफर आली होती, पण मी जाणार नाही.’ असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे .

त्याचबरोबर मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला त्यांच्या नेत्यांशी थेट बोलणी करण्यास सांगितलंही होतं. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात  सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ असं राणे यावेळी म्हणाले.

शिवसेनेची ऑफर धूडकावताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका देखील केलीये. समजा, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत असेल किंवा नसेल तरीही शिवसेना माझी अडवणूक करु शकत नाही. शिवसेनेचा एकही नेता मला अडवू शकत नाही. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही.’ असं म्हणत राणेंनी त्यांना शिवसेनेला डिवचलं.