fbpx

मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो, रोहितचे खळबळजनक ट्विट

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला आहे. येत्या शनिवार (३ ऑगस्ट) पासून त्यामुळे या दौऱ्यावर भारतीय संघ टी 20 मालिका आणि कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे विश्वचषकातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ कसा कम बॅक करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे भारतीय संघातील एकी आता संपुष्टात आली आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याचं समोर आल आहे. आता रोहितने विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी एक ट्वीट केले आहे.रोहितने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो, असे ट्वीट रोहितने केले आहे. यासोबत त्याने मैदानात उतरतानाचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

दरम्यान या वादावर विराटने ही भाष्य केले होते. विराटने रोहितसोबत असलेल्या मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले. रोहित शर्मासोबत कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा यावेळी विराट कोहलीने केला. या विश्वचषकात रोहित शर्माने ५ दमदार शतक मारली आहेत.