fbpx

“बहिणीच्या प्रचारासाठी जीपच्या टपावर चढून पहिला घोषणा मी दिली”

टीम महाराष्ट्र देशा – 2009 मध्ये पंकजा मुंडे यांचे तिकीट माझ्या वडिलांनी जाहीर केले. सलग दहा ते पंधरा वर्ष काम करून आणि 2009 मध्ये मी निवडणूक लढवावी, अशी लोकभावना असतानाही पंकजाताईंसाठी मी आमदारकी सोडली. त्यावेळी जीपच्या टपावर चढून माझ्या बहिणीच्या प्रचाराच्या घोषणा देणारा पहिला मी होतो, अशी आठवण धनंजय मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना करून दिली.

मुंडे म्हणले की, २००९ ला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभेची निवडणूक पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय दिला. तो आम्ही मान्य करून माझ्या वडिलांनी तेंव्हा पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केली.

त्यानंतर माझ्या बहिणीच्या प्रचारासाठी जीपच्या टपावर चढून ‘ पंकाजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देणारा पहिला मी होतो. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी राजकारण सोडायचा विषय नाही, आम्हीच त्यांच्यासाठी २००९ला विधानसभेची त्यांच्यासाठी सोडली असल्याचे सांगत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेला दावा धनंजय मुंडे यांनी खोडून काढला आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचे निधन, अपघात की घात? हा मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे. साहाजिकच माझ्या मनातही शंका आहे. सामान्य लोकांना सीबीआयचा अहवाल मान्य नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे समाधान हे सरकार करणार आहे का? असा प्रश्न मुंडे यांनी विचारला.