‘आर्यनला दोनदा गांजा दिला होता’, अनन्याने चौकशीदरम्यान दिली कबुली

‘आर्यनला दोनदा गांजा दिला होता’, अनन्याने चौकशीदरम्यान दिली कबुली

annay

मुंबई : गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला होता. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घराचीही झडती देखील घेतली होती.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात पहिले नाव समोरआले ते म्हणजे अनन्या पांडे. त्यामुळे अनन्याला एनसीबी कडून समन्स बजावण्यत आले होते. या प्रकरणात अनन्याची दोन वेळा कसून चौकशी झाली. आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनन्या पांडेने धक्कादायक खुलासे केले. आर्यन खानला गांजा दिल्याची कबुलीही अनन्यानं यावेळी एनसीबीला दिली.

आर्यन खानसोबत झालेल्या चॅटिंगवरुन एनसीबी अनन्याची चौकशी करत आहे. शुक्रवारी झालेल्या चौकशीदरम्यान अनन्यानं आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याची कबुली दिली आहे. पण आपण कोणत्याच्या ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचेही यावेळी तिने एनसीबीला सांगितलं.

मात्र, तिचा एक मित्र आहे जो खूप मोठा व्यक्ती आहे. त्याला सांगितल्यावर तो गांजा अरेंज करून देतो. आर्यन खानच्या सांगण्यावरून फक्त एकदा किंवा दोनदाच त्याला गांजा आपल्या या मित्राकडून मागून दिला. अनन्याच्या मित्राने त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून गांजा पाठवला होता..असं अनन्याने एनसीबीला सांगितलं. हा गांजा अनन्याने आपल्या स्टाफ द्वारे कलेक्ट केला होता जे नंतर तिने आर्यनला दिला. अनन्याच्या या स्टेटमेंट नंतर आर्यनच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच बॉलीवूड मधून अनेक बड्या कलाकारांची नावे देखील समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या