‘त्या’ क्षणी मी सर्व काही गमावले असच मला वाटलं होतं… -अमृता फडणवीस

पुणे: पती निधनाचे आघात पचवून कणखरपणे कुटुंब सावरणाऱ्या महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात सत्कार करण्यात आला, पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळ्यात या महिलांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

पतीच्या अकाली निधनाने आलेल्या वैधव्याने डगमगता प्रतिकूल परिस्थिती मध्ये आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाणाऱ्या हिरकणीच दर्शन घडले अशी भावना अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. अमृता फडणवीस यांनी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची कटू आठवण सांगत, हेलिकॉप्टरची दुर्घटना होऊन ही तुमच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस बचावले, पण या दुर्घटनेची माहिती मिळताच क्षणी मी सारे काही गमावले असच मला वाटलं होतं असं सांगत अमृता फडणवीस यांनी यावेळी आपल्या भावनांना मोकळी वाट कटुन दिली.

amruta fadanvis

अमृता फडणवीस यांनी मुलींना जन्माला येऊ न देता त्यांना मारून टाकणे ही अपप्रवृत्ती असल्याच सांगत अनेक पुरुषप्रधान क्षेत्रात महिला यशस्वी काम करत असल्याचं सांगितलं, पतीच्या निधनानंतर दुःख पचवत सैन्यदलात कर्नल पदावर काम करणाऱ्या स्वाती महाडिक आपल्यासाठी आदर्श आहेत. तुमची मुलगी देशाचं भविष्य आहे अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी मांडल्या. भाजप कार्यकर्ते बाळासाहेब अमराळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांच्या सोबत समरसता परिषदेच्या अध्यक्षा डॉ श्यामा घोणसे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि सांगलीच्या नगरसेविका स्वरदा बापट ही उपस्थित होत्या.

4 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...