‘विविध मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी दीपिकाने माझ्यासारखा सल्लागार नेमावा’

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणे अभिनेत्री दीपिका पदूकोण चांगलेच महागात पडत आहे.दीपिकाने या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर तिची प्रमुख भूमिका असलेल्या छपाक चित्रपटाला फटका बसला आहे.

हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा लिक झाल्याचं देखील बोलले जात आहे.यामुळे या सिनेमाच्या कमाईवर आता आणखी परिणाम होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना आता दीपिकाने ज्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे अशा जाहिराती दाखवण्याचे प्रमाणही कमी करण्यात आलं आहे.

या प्रकरणी आता रामदेव बाबा यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. बाबा म्हणाले,’सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त केला पाहिजे.

रामदेव बाबा पुढे म्हणाले,’दीपिकामध्ये अभिनयाचे गुण असणे ही वेगळी गोष्ट आहे. राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे मुद्द्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी देशाबद्दल जाणून द्यावे लागले आणि तिला वाचनही करावे लागेल. तिने हे समजून घेतल्यानंतर मोठे निर्णय घेतले पाहिजे. तसेच अशा प्रकारच्या वादाच्या प्रसंगात योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी तिने माझ्यासारखा सल्लागार ठेवला पाहिजे’, असेही रामदेव बाबा म्हणाले.