मराठा समाजातील तरुणांची अवस्था बघून वाईट वाटते- पंकजा मुंडे

pankaja munde

पुणे: मराठा समाजातील तरुणांची अवस्था बघून मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. मराठा समाजाकडे आत्तापर्यंत सत्ता होती, परंतु जोपर्यंत सामाजिक मागासलेपणा जात नाही, रोटी-बेटीचे व्यवहार विशिष्ट समाजाबाहेर होत नाहीत, तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दाही जाणार नाही. असे पंकजा मुंडे म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटना आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरणप्रसंगी मुंडे बोलत होत्या.

जाती-पातींचे राजकारण वाढत चालले आहे. प्रत्येक समाजातील उपजातींना वेगळे करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार केवळ एकाच विशिष्ट समाजापुरता मर्यादित राहू नये, तर अन्य जातीतील व्यक्तींनाही दिला पाहिजे. असे मुंडे म्हणाल्या.

Loading...

यावेळी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शांमुजुमदार उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली