मला माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटतंय, सुशांतच्या घरी नानांना भावना अनावर

पाटणा : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सिनेसृष्टीसह सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतला आज 14 दिवस झाले. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकार ते राजकीय नेतेमंडळी त्याच्या पाटणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत. रविवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर हे देखील पाटणा येथील सुशांत सिंहच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. यादरम्यान, नाना पाटेकर अत्यंत भावूक झाले होते.

तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे शक्य – राज्यपाल

पाटणा येथे सुशांतच्या घरी जात जी परिस्थिती उदभवली त्याबाबत नानांनी दु:ख व्यक्त केलं. सुशांतच्या वडिलांना, त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. सुशांत एक अतिशय चांगला आणि उत्तम अभिनय सादर करणारा अभिनेता होता. तो आता या जगात नाही, यावर आपला विश्वासच नसल्याची भावना नानांनी व्यक्त केली.

गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही – गिरीश महाजन

सुशांत आपल्यामध्ये नसल्याचं दु:ख आपण अद्यापही पचवू शकलो नसून, मी माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटत आहे, असं म्हणत नानाही भावूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात. तो फारच लहान होता. यापुढंही तोआणखी ३० वर्षे काम करु शकत होता या शब्दांत त्यांनी त्याच्या नसण्याची भावना व्यक्त केली.