मुंबई : शिवसेनेतील आमदार व एकनाथ शिंदे गटातील आमदार पहिल्यांदाच आज विधानसभेत समोरासमोर आले. मागील काही काळापासून विधानसभेचे अध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे आज दोन दिवशीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. हे निवडणूक नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने घेतली गेली. यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर यांचा १६४ मतासह विजय झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात कमी वयात विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.
अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले की, “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं”.
अजित पवार पुढे म्हणाले, “मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत. पहिली रांग पाहिली तरी ते लक्षात येईल. गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे आमच्याकडून गेलेले मान्यवर पहिल्या ओळीत आहेत.”
अजित पवारांच्या या टोल्या नंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “अजित दादा जर तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय आमच्या कानात येऊन सांगा” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर खोचक टीका केली.
अजित पवार म्हणाले की“मी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुचवलं होतं. म्हटलं काय बडबड करायची ती तिथं बसून करावी. किती तास, किती मिनिटं, किती सेकंद, किती वर्ष सगळं सागू द्यावं,” असं म्हणत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला. तसेच यानंतर मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या असंही म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<