मी गौतम गंभीरचं वनडे करियर संपवलं 

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जायचा. त्याच्या रागीट स्वभावामुळे त्याने अनेक वेळा विरोधी खेळाडूंशी मैदानातचं हुज्जत घातली होती. पाकिस्तानचा माजी कर्णधार शहीद आफ्रिदी आणि पाकिस्तानशी त्याचा ३६ चा आकडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने गौतम गंभीरच्या करियरविषयी एक अजब दावा केला आहे. त्याने मी गंभीरचे वनडे करियर संपवले असल्याच एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. त्याने २०१२ च्या एकदिवसीय आणि टी २० सामन्यांच्या मालिकेत ४ वेळा बाद केल्याने तो संघाबाहेर पडला आणि पुन्हा पुनरागमन करू शकला नाही असं तो म्हणाला आहे.

इरफानने मुलाखतीमध्ये भारतीय फलंदाज माझ्या गोलंदाजीचा सामना करताना अडखळत होते. माझ्या उंचीमुळे अनेक फलंदाजांना गोलंदाजीचा अंदाज बांधता येत नव्हता. गंभीर तर माझ्या गोलंदाजीचा सामना करणे टाळायचा. सराव सत्रात तो माझ्या नजरेला नजरही देत नव्हता. 2012च्या मालिकेत मी त्याला चारवेळा बाद केले होते. त्यानंतर गंभीरला संघातील स्थानही गमवावे लागले. गंभीरची कारकीर्द संपवली म्हणून अनेकांनी माझे अभिनंदनही केले असं विधान केले आहे.

दरम्यान, गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. सध्या तो लोकसभेचा खासदार आहे. गौतम गंभीरने त्याच्या कारकिर्दीत ५८ कसोटी, १४७ वनडे आणि ३७ टी २० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीमध्ये ४१५४ वनडे मध्ये ५२३८ तर टी २० मध्ये ७८३ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या