‘पूरग्रस्तांना मदत करताना माझा फोटो अजिबात वापरायचा नाही’

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. अशातच राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे.

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना ५ कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे’ अशी माहिती दिली आहे.

परंतु त्यांनी ‘कोल्हापूर-सांगली पूरग्रस्त लोकांना मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका! जे काही द्यायचं आहे ते निस्वार्थ भावनेनं द्या! अस ट्वीट केले आहे. दरम्यान सरकारकडून देण्यात येणाऱ्या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात आले होते त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर सरकारने ते स्टीकर हटवले आहेत.

भाजपबरोबर राष्ट्रवादीकडून देखील पूरग्रस्त भागात मदत म्हणून देणाऱ्या अन्न धान्यांच्या पाकिटावर नेत्यांचे फोटो टाकले होते. त्यामुळे त्यांनाही जनतेच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. परंतु आता या विषयी राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या