…त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत- परमबीर सिंह
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंडीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
परमबीर प्रतिज्ञापत्रात म्हणाले की,’मी माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेली आहे. आता त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत वा उलटतपासणीही करायची नाही’,असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, त्यांच्या शपथपत्रात त्यांनी अशी भूमिका मांडली आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही, असेही ते म्हणाले आहेत. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल