नागपूर : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिवसातून २२ तास जागे असतात. ते केवळ २ तास झोपतात. सध्या नरेंद्र मोदी एक प्रयोग करत असून तो म्हणजे त्यांना झोपावं लागणार नाही, असे वक्तव्य केले. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,’मोदी साहेब खूप काम करतात. तसेच ते फक्त दोन तास झोपतात. हा चांगला प्रयोग आहे परंतु आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचे नाही असे बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवल आहे’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून (२२ मार्च) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत असून यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. संजय राऊत हे सुद्धा या अभियानासाठी काल(२१ मार्च) नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “… तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू”, अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर राऊतांचे प्रत्युत्तर
- काश्मीरमधील आशियातले सर्वांत मोठे ‘ट्युलिप गार्डन’ लवकरच होणार खुले
- IPL 2022 : ‘किंग कोहली’ स्पर्धेआधी आरसीबीच्या संघात सामील; चाहते सुखावले!
- मविआ सरकारने छत्रपतींचीही फसवणूक केली- चंद्रकांत पाटील
- IPL 2022 : ‘त्याने मला फिनिशर कसे बनायचे सांगितले’; दिल्लीच्या स्टॉइनिसला चेन्नईच्या ‘थाला’ने दिले मास्टरक्लास