‘आडनावांवरून जात नाही समजत मला, पण चेहऱ्यावरून स्वभाव समजतो’, अश्विनीने शेअर केला अनोखा अनुभव

अश्विनी महांगडे

मुंबई : अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणूआक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अश्विनी सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत एक अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत लिहिले की, स्थळ – खेड- शिवापूर टोल नाका, समोरून – ही सेम राणूआक्कांसारखी दिसतेय न. सज्जू – आहो त्याच आहेत. आणि मग फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. आडनावांवरून जात समजावी एवढी मोठी अजून झाले नाही. पण चेहऱ्यावरून स्वभाव समजेल एवढी नक्कीच झालेय. जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी हे नानांनी शिकवले. आणि तसेही आमचे नाते कलाकार आणि रसिक माय-बाप हे आहेच की…’

अश्विनीला खेड- शिवापूर टोल नाका येथे काही किन्नरांनी ओळखले आणि मग अश्विनीने त्यांची विचारपूस केली. त्यांच्यासोबत फोटो काढले. तिथे तिला आलेला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अश्विनीच्या ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP