दूध दरवाढीबाबत बोलघेवड्या राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा अजिबात भरोसा राहिलेला -सुजय विखे पाटील

sujay vikhe patil vs uddhav thackeray

नगर- दूध दरवाढीचा प्रश्न चिघळलेला असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून फक्त बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ लावणाऱ्या राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा अजिबात भरोसा राहिलेला नाही. या बोलघेवड्या सरकारने आता चर्चेचे गुऱ्हाळ थांबून दूध दरवाढीबाबत व दुधाच्या दरांमध्ये सातत्याने ठेवण्याबाबत ठोस निर्णय जाहीर करावा . जोपर्यंत राज्य सरकार हे करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाहीत व सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन चालूच राहतील असा दावा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पारनेर येथे दूध आंदोलन वेळी केला.

पारनेर येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांचे आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी दूध उत्पादक शेतकर्यांसमोर बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महाआघाडी सरकारच्या कारभाराबाबत कठोर टीका केली.

मागील भाजप सरकारच्या काळामध्ये दिलासा देण्यासाठी दुधाचे दर टिकून राहण्यासाठी राज्य सरकारने दूध उत्पादकांना संकलन केंद्रांमार्फत अनुदान दिले होते. सध्याचे महा विकास आघाडीचे सरकार सरकारने हे अनुदान बंद करून दुधाची भुकटी बनवण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र जून-जुलै या दोन महिन्यात संकलित केलेल्या दुधाची जर राज्य सरकारने दूध पावडर बनवलेली असेल तर ती निर्यात का नाही केली. दूध उत्पादकांना थेट रक्कम मिळण्याच्या ऐवजी दूध पावडर बनवण्याचा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय कोणाच्या हितासाठी घेतला?दूध उत्पादकांना दिलासा देण्याबाबत जर निर्णय झालेला असेल तो जाहीर करण्यात कोणचा मुहूर्त राज्यसरकार शोधताहेत असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.

आंदोलन प्रसंगी दूध रस्त्यावर न फेकून देता दुधाच्या पिशव्या पारनेर येथील कोविड सेंटर वर देण्यात आल्या. खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी टाकळी ढोकेश्वर व परिसरात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या शिवारस भेटी दिल्या. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंतरावजी चेडे, महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष अश्विनी ताई थोरात , आर पी आय पारनेर चे तालुका अध्यक्ष अमित जाधव, राहुल पाटील शिंदे , सचिन वराळ आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’

महविकास आघाडीची ‘नाचत येईना अंगण वाकडं’ अशी अवस्था: चंद्रकांत पाटलांचा टोला