केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, हे वक्तव्य मला योग्य वाटत नाही- पंकजा मुंडे

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, हे वक्तव्य मला योग्य वाटत नाही- पंकजा मुंडे

pankja munde

नवी दिल्ली : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असतांना सहकार क्षेत्र आज अडचणीत आहे, शेतकरी संकटात आहे, त्यामुळे आजची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट महत्त्वाची आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपकडून पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. सकारात्मक विषयांवर चर्चा सुरु आहे. मी राष्ट्रीय सचिव म्हणून सांगतेय महागाईवर तोडगा निघेल, असेही त्या म्हणाल्या.

पुढे बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजात संताप आहे. राज्याने दिलेले आरक्षण ५० टक्क्यांच्या वर होते. त्याच्यावर आम्ही राजकीय, सामाजिक भूमिकेतून बोललेलो आहे.

दरम्यान, ‘राज्यातला सहकार डबघाईला आला आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. नुकसानातील भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेतला पाहिजे. सहकार क्षेत्र आज अडचणीत आहे. निवडणुकांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरु राहिला पाहिजे. त्या दृष्टीने आजची फडणवीस-शहा भेट महत्त्वाची आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, हे वक्तव्य मला योग्य वाटत नाही. साखर उद्योग जगवण्यासाठी सरकारने पॅकेज दिले पाहिजे. साखऱ उद्योगावरील कर्जाचा डोंगर कमी करताना करकपात झाली पाहिजे,’ असेही यावेळी त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या