‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही’

sambhaji raje

मुंबई : खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. मोर्चा काढायचा रद्द करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांना केला आहे.

संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. आधी मोर्चा काढतो म्हणाले. नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटले. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हणाले. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असं पाटील म्हणाले. आम्ही मोर्चा काढणार नाही. पण दुसरे कुणी मोर्चा काढत असतील, तर त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ असे आमदार पाटील यांनी म्हटले. खासदार संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे असाही गर्भित इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला.

यावर आता खासदार संभाजी छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल, चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यानंतर बघू, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी आज खडसावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP