क्रीडा क्षेत्रात इतका रस घेणारा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहिला नसावा: बबिता फोगाट

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळांविषयी आणि खेळाडुंमध्ये रस घेतात, त्यांच्याविषयी बोलतात, हे बघून बरे वाटते. क्रीडा क्षेत्रात इतका रस घेणारा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहिला नसावा, असे मत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती कुस्तीपटू बबिता फोगट हिने व्यक्त केले. बॅडमिंटनपटू सायना नेहवालनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. सध्या खेळाडूंसाठी सर्वोत्कृष्ट काळ असल्याचे सांगताना, सगळ्या खेळांमध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सायनानं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा केली होती. तसेच सगळ्या विजेत्या खेळाडूंचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले होते. या पार्श्वभूमीवर आज बबिता फोगट आणि सायना नेहवाल यांनी आज पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

सध्या खेळाडूंसाठी सर्वोत्कृष्ट काळ असल्याचे सांगताना, सगळ्या खेळांमध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सायनाने सांगितले.

बबिता फोगटने मोदी यांची शाबासकी महत्त्वाची असल्याचे सांगताना, याआधी कुठल्याही पंतप्रधानाने अशी वागणूक खेळाडूंना दिली नव्हती असेही म्हटले आहे. खेळामध्ये मोदींएवढा रस याआधीच्या कुठल्याही पंतप्रधानानं घेतला असेल असं मला वाटत नाही असं बबिता म्हणाल्याचे वृत्त एएनआयनं दिलं आहे.