मला ‘नाईटलाईफ’ हा शब्दचं मुळात आवडत नाही:मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा: आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफ संकल्पनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मुळात मला ‘नाइटलाइफ’ हा शब्दच आवडत नाही,पण मात्र आम्ही मुंबईत काही भागात हा प्रयोग करुन पाहणार आहोत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलतांना केले.

यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, नाइटलाइफ संकल्पना राज्यभरात लागू करण्याचा सध्यातरी विचार नाही, प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असते. मुंबईतल्या काही भागात आम्ही हा प्रयोग करणार आहोत.एकदा आम्ही मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देणार आहोत. त्यानंतर याचा आढावा आणि परिणाम याची माहिती घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं सांगितले.

Loading...

मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्या पोलिस यंत्रणेवरील ताण पाहता नाइटलाइफबाबत २२ जानेवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर यावर निर्णय होईल असं सांगितले आहे.

पण यावर महाराष्ट्र भारातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'