‘मला क्रिकेट आवडत नाही…’, दिल्लीच्या पराभवानंतर युवराजचे ट्विट चर्चेत

yuvraj

अबुधाबी : आयपील २०२१ स्पर्धेत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला नमवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुसऱ्या पात्रता फेरीत शानदार गोलंदाजी केल्यानंतर व्यंकटेश अय्यर-शुभमन गिलच्या फलंदाजीमुळे तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने 3 गडी राखून विजय मिळवला. दोन वेळचा चॅम्पियन केकेआर अंतिम फेरीत तीन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना करेल. केकेआरने यापूर्वी दोनदा अंतिम फेरी गाठली आहे आणि दोन्ही प्रसंगी विजेतेपद मिळवण्यात यश मिळवले आहे.

केकेआरच्या अचूक आणि तगड्या गोलंदाजीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शिखर धवनशिवाय दिल्लीचा दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर राहू शकला नाही. शिखर नक्कीच खेळपट्टीवर राहिला पण वेगवान धावा करू शकला नाही. अशा स्थितीत दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 5 गडी बाद 135 धावा करू शकली. दिल्लीच्या परभवानंतर या भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने ट्वीट केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

युवी ट्विट करत म्हणाला, ‘मला क्रिकेट आवडत नाही, तर माझे क्रिकेटवर प्रेम आहे. काय हा खेळ आहे. कोलकाताचे अभिनंदन. ऋषभ पंत आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी मला वाईट वाटत आहे, पण हा एक खेळ आहे. यात फक्त एकच विजेता असू शकतो.’ दिल्ली हा सामना जिंकणार असे चित्र दिसत असताना कोलकाताने अनपेक्षित विजय मिळवला. हे चित्र पाहून युवीने मला क्रिकेट गेम फार आवडतो कारण इथे अनपेक्षित गोष्टी घडतात.असं या ट्विटमधून युवीने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या