‘५१८ चित्रपटांमध्ये काम करूनही मला ओळखल नाही’ ; डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीये’ ; व्हिडीओ होतोय व्हायरल

anupam kher

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची सिनेसृष्टीत एक उत्तम कलाकार म्हणून ओळख आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अनुपम खेर  यांना अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. अनुपम खेर भारतातच नाही तर परदेशात देखील लोकप्रिय कलाकार आहेत.

मात्र नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगामुळे अनुपम खेर यांच्यापुढे आता जगावं की मरावं  प्रश्न पडला. झाले असे अनुपम खेर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत सिमला येथे कुटुंबियांनसोबत वेळ घालवत आहेत. इथेच अनुपम खेर यांची एका अशा व्यक्तीशी भेट झाली त्या व्यक्तीने दिग्गज अभिनेता असूनही अनुपम खेर यांना ओळखलं नाही. यानंतर अनुमप खेर स्वत: हैराण झाले आहेत.

या घटनेचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम खेर रस्त्यावरून जाणाऱ्या एक व्यक्तीची विचारपूस करतात. ते कुठे राहतात. किती दूर त्यांचं घर आहे. त्याचं नाव विचारतात. पुढे अनुपम खेर म्हणतात, “तुम्ही मला ओळखता का?” यावर ही व्यक्ती नाही असं उत्तर देते. त्यानंतर अनुपम खेर मास्क काढून पुन्हा त्यांना ओळखलं का? असा प्रश्न विचारतात. यावर “सर तुमचं नाव लक्षात नाही” असं उत्तर या वाटसरूने दिल्यानंतर अनुपन चकित झाले. यानंतर मजेशीर अंदाजात अनुपम खेर व्हिडिओत म्हणतात, “५१८ सिनेमांमध्ये काम करूनही मला यांनी ओळखलेलं नाही. डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीय.”

महत्वाच्या बातम्या 

IMP