मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक अट ठेवत ‘मी राजीनाम देणार’ असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधला. यावेळी “ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे”,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर संदीप देशपांडे यांनी “अजून कितीवेळा सांगायचं”, असे ट्विटद्वारे म्हंटले आहे. संदीप देशपांडे यांच्या ट्विटमध्ये एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोला “मामू म्हणून मी लायक नाही आहे, असं तोंडावर सांगा मी लगेच राजीनामा देतो” असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, नारायण राणे यांचा एकत्र फोटो आहे. या फोटोला “आम्ही तर हजार वेळेस सांगितलंय”, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.
अजून किती वेळा सांगायचं pic.twitter.com/oH9k9Ccwji
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 23, 2022
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
दरम्यान या राजकीय गदारोळावर उद्धव ठाकरे यांनी काल आपली भूमिका मांडली आहे. “शिवसेनेच्या आमदारांनी मला येऊन सांगावं की, तुम्ही मुख्यमंत्री नकोय आम्हाला. फक्त समोर येऊन सांगावं किंवा माध्यमांच्या सहाय्याने संवाद साधला तरी चालेल पण मी मुख्यमंत्री नकोय असे जेव्हा ते त्यांच्या तोंडून सांगतील त्या क्षणी मी राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –