Share

Prakash Ambedkar | “पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही, पण…”; प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेनं अकोल्यात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही. पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. अकोल्याच्या क्रिकेट क्लबवरील मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.

पुढे ते म्हणाले, लोकसेवक म्हणून सत्ता चालविणारे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. लोकशाही टिकायला हवीच आणि विचार स्वातंत्र्याही अबाधित राहायला हवे. यासाठी सर्वांनी एकजूट राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आगामी सरपंच पदाची निवडणूक पक्ष म्हणून लढणार असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांनी पक्षासोबत राहून पदाधिकाऱ्यांनी सांगिलेल्या बाबींचे पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अनेकांनी सत्ता मिळविली. काही तर कायम स्वरुपी खुर्चीला चिकटून बसले आहेत. अशांना कायमचे मंत्रिपद दिले पाहिजे, असा टोला आंबेडकर यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लगावला.

भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी असली असल्याचं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली. दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास प्रचंड आर्थिक संकट ओढावेल. महागाई नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ही प्रयत्न करावेत, असे आवाहनही अँड आंबेडकर यांनी केले.

देवेंद्र फडणवीसांचं डिमोशन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत असा टोला  त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना  लगावला. तसंच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार आहे अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या. एकमेकांच्या उरावर बसायचं असेल तर खुशाल बसा. आरेला कारे करण्याची तयारी ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेनं अकोल्यात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now