फडणवीसांच्या मी मुख्यमंत्री नाही असं वाटतच नाही; या वक्तव्यावर पंकजा म्हणाल्या..

pankaja munde

औरंगाबाद : चांगली गोष्ट आहे आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर ती गोष्ट चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, जनतेने मला ते कधी जाणवू दिले नाही असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे बोलत होत्या. औरंगाबादेत भाजपकडून आज ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली.

ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला यावेळी दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा निघतो तेव्हा हे षडयंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही.

मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, चांगली गोष्ट आहे आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर ती गोष्ट चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट असल्याचे सांगत. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री यातील मनातला हा शब्द तुम्ही खेचू शकत नाही असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या