मुंबई:- गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. दरम्यान, जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत. लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर जयंत पाटील अनुकंपा निकषावर राजकारणात आले आहेत, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
पडळकर यांच्या टीकेवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला मी गाभीर्यानं घेत नाही, असं म्हणत पाटील यांनी पडळकर यांच्या टीकेला केराची टोपली दाखवली आहे. ते सकाळी माझ्याबरोबरच्या बैठकीला नीट होते. मी मुंबईत येईपर्यंत वेगळे काय बोलले हे मला समजत नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर जयंत पाटील यांनी मिश्कील टिपण्णी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातूरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर
- अधिकाऱ्यांच्या लसीकरणानंतर शंका-कुशंका झाल्या दूर
- देवमाणसातील राक्षस; मुलगा न झाल्याने डॉक्टरकडून पत्नीसह मुलीला मारण्याचा प्रयत्न
- जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत; पडळकरांची खोचक टीका
- ‘या’ खेळाडूला KKR संघातून करारमुक्त करायला हवे होते’ गंभीरने व्यक्त केलं स्पष्ट मत !