fbpx

जातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी

नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा : माझ्याकडे कोणीही जातीचं राजकारण करायला आलं तर त्याला मी प्रतिसाद दिला नाही. नागपुरातील अनुसूचित समाज कायमच भाजपासोबत राहिला आहे, कारण नागपुरात जातीचं राजकारण चालतच नाही. माणूस हा जातीने मोठा होत नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

नागपुरात भाजपाच्या अनुसुचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले, काँग्रेसने आमच्याबद्दल अपप्रचार केला. भाजपा हा उच्च जातीच्या लोकांचा पक्ष आहे. तिथे स्पृश्य-अस्पृश्यता पाळली जाते असे सांगत भाजपाबद्दल काँग्रेसनं भ्रम पसरवला. मात्र आम्ही सामाजिक समानता मानणारी माणसे आहोत त्याच धोरणावर आम्ही काम करतो असंही गडकरी यावेळी म्हणाले. राजकारणात एक नियम आहे कनव्हिन्स करता आलं नाही तर कनफ्युज करा, काँग्रेसकडून हीच नीती वापरली जाते आहे असाही आरोप नितीन गडकरींनी यावेळी केला.