मला माहित नाही माझी नाराजी दूर करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत

टीम महाराष्ट्र देशा : मला माहित नाही माझी नाराजी दूर करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहेत. मात्र पंकजा मुंडे यांची आज मी भेट घेणार आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिली.

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. याची गंभीर दाखल घेत नाराज एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहे. दिल्लीतील नेते भूपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

नाराज खडसेंची समजूत काढण्यासाठी विनोद तावडे आणि भूपेंद्र यादव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी ते खडसे यांची भेट घेणार होते. त्यानंतर त्यांना ते म्हणाले, की काल मी दिल्ली गेल्या नंतर राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने वाढल्या आहेत. निवडणुकीत पक्ष विरोधी काम केलेल्यांचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. त्यानंतर त्यांच्याशी काही बोलणे झाले नाही. १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत मी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहे.मी स्वतः भगवान गडावर जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खडसे काल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना आणि दिल्लीतील नेते भूपेंद्र यादव यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर त्यांनी सहा जनपथवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते लगेच मुंबईला निघाले. आज खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले आहे. आता उद्धव ठाकरेंच्या निरोपाची वाट पाहण्याची आता खडसेंवर वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :