भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये

टीम महाराष्ट्र देशा –  सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असे प्रतिपादनही भागवत यांनी दोन दिवसापूर्वी केले होते.

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर बोलताना कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, ‘भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही. देशाने फॅमिली प्लॅनिंग स्वीकारलं असून, मुलं जन्म घाल्याण्याच प्रमाण तीन वरून आता दोन वर आलं आहे. भागवतांनी नसत्या उठाठेव करू नये, असेही ते म्हणाले.

Loading...

सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असे प्रतिपादनही भागवत यांनी दोन दिवसापूर्वी केले होते. ते उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, ‘लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघा राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल,’ असे मोहन भागवत म्हणाले.

तसेच CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरही चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतप्रदर्शन केले. याबाबत बोलताना भागवत म्हणाले, ‘सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असे ते म्हणाले. दरम्यान, मोहन भागवत यांनी याआधी डिसेंबर महिन्यात देशातली 130 कोटी जनता हिंदूच आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच वाद ओढवला होता. आता त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे असं वक्तव्य केले होते.

कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई सोलापूर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी सावरकर आणि भागवत अशा दोन्ही मुद्द्यांवर भाष्य केले . दलवाई म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच देशासाठी त्याग मोठा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसाठी दिलेलं योगदान आपल्याला विसरता येणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी सोलापूर येथे सावरकर यांचं योगदान अधोरेखित केलं आहे.

तसेच शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यामध्ये फरक आहे. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेसला मदत केलेली आहे. आणीबाणीच्या काळात देखील बाळासाहेब ठाकरेंनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता, असे दलवाई म्हणाले. यावेळी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही. देशाने फॅमिली प्लॅनिंग स्वीकारलं असून, तीन वरून आता ते दोन वर आलं आहे. भागवतांनी नसत्या उठाठेव करू नये, असेही ते म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात