पवनराजे हत्याकांडाबाबत मला काहीच माहित नाही : अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आज समाजसेवक अण्णा हजारे यांची सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयात साक्ष होती. यावेळी अण्णा हजारेंनी धक्कादायक वक्तव्य केली आहेत. तर पवनराजे हत्येबाबत मला काही माहित नसल्याच त्यांनी सांगितल आहे.

साक्ष देताना अण्णा हजारे म्हणाले की, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाची आपल्याला काहीही माहिती नाही. जी माहिती समजली ती केवळ वृत्तपत्र आणि मीडियातूनसमोर आलेल्या बातम्यांवर आधारीत होती, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं. तसेच तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी आपण पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र नंतर या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र याचा राग मनात धरून, पद्मसिंह पाटलांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती, असे धक्कादायक विधान देखील केले आहे.

Loading...

दरम्यान काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील कळंबोली येथे २००६ मध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना जून २००९ मध्ये अटक केली. त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने २५ नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांना जामिनावर मुक्त केले. पवनराजेंचा आपल्या राजकीय भवितव्याला धोका असल्याचे निंबाळकरांना वाटत होते. म्हणून त्यांनीच पवनराजेंच्या हत्येचा कट आखला. त्यासाठी त्यांनी तीस लाखाची सुपारी दिली. असे या आरोपपत्रात म्हटले आहे.

हत्येच्या कटाचे ते प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. निंबाळकर यांच्या हत्येसाठी सुपारी देणे आणि कटाची आखणी असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केंदीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलच्या कोर्टात पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

६ जून २००९ रोजी सीबीआयने यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि १२० ब नुसार खून-खूनाचा कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांना ‘क्लीन चिट’ दिली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार