fbpx

प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही ; शरद पवारांचा अमित शहांना खोचक टोला

पुणे : प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही. दुस-या दिवशी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांमध्ये फोटो यावा, अशी कधीच अपेक्षा नसते. अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना फटकारलं आहे. तर मी कधीच वारीला जात नाही, मात्र वारीचा अनादरही करत नाही. काही कामानिमित्त सोलापूर भागात गेलो तर मोजक्या लोकांसह पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेतो अस देखील शरद पवार म्हणाले.

राष्ट्र सेवा दलातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शामसुंदर महाराज सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी एस.एम.जोशी सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते.

दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या काल पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत. आज दोन्ही संताच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सकाळीपासूनच पुणेकरांची अलोट गर्दी लोटली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

शनिवार आणि रविवारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी आहेत. दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त अमित शहा आले असता त्यांनी ज्ञानोबा माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आहे. यावरच निशाना साधत शरद पवार यांनी अमित शहा यांना लक्ष केल आहे.

1 Comment

Click here to post a comment