fbpx

आमच्यावर आईचे संस्कार, पंतप्रधानांवर टीका करणार नाही : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींनी वर्ध्यात सभा घेतली होती त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली होती. आम्हाला आमच्या आईनं योग्य ते संस्कार दिले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींनी वैयक्तिक आरोप केले असले तरी मी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक आरोप करणार नाही, अशा शब्दात शरद पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक आणि मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टींच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये तसंच वैयक्तिक किंवा घराण्यावर आरोप करण्यापेक्षा दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला,अशा शब्दात मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

मोदी जिथं जातात तिथे खाजगी टीका करतात. वैयक्तिक टीका आमच्या संस्कृतीत बसत नाही त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. असही पुढे बोलताना म्हणाले.