मी निवडणूक लढवत नाही, तरीही भाजपवाले फडफडत आहेत : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी इचलकरंजी इथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे निवडणूक लढवत नसले तरी प्रचार करत आहेत त्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे त्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आह्रे.

राज ठाकरेंनी “मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत, निवडणूक आयोगाला विचारत आहेत कुठल्या खात्यात खर्च मोजायचा. कुठल्या खात्यात म्हणजे आमच्या खात्यात” अशा शब्दात भाजपाला उत्तर दिले आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘मी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, मी ज्या पद्धतीने प्रश्न विचारतोय त्याचा एक फायदा लक्षात घ्या की यापुढे कुठलाही राजकारणी खोटं बोलणार नाही, तुम्हाला गृहीत धरणार नाही, कारण ते खोटं बोलले तर अशा क्लिप्स बाहेर येतील आणि लोक प्रश्न विचारतील’ अशा शब्दात भाजपाला टोला लगावला.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘मोदी आणि अमित शाह हे दोघे या देशाला लागलेले कलंक आहेत, ते लोकशाही संपवून टाकतील’ अशा शब्दात मोदी आणि शाह यांचा समाचार घेतला.