Share

Rutuja Latake । “मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”; न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचे कळवा, असा आदेश काेर्टाने मुंबई महापालिकेला दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

“मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”, असं ऋतुजा लटके म्हणाल्या आहेत. उद्या फॉर्म भरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. नवं चिन्ह आहे ,माणसं जुनी आहेत अशा शब्दात ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच त्यांच्यासोबत रमेश लटके यांचा आशीर्वाद असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्या भावुक झाल्या.

कोर्टाच्या निकालानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. मला न्याय देवतेवर विश्वास होता. मला न्याय मिळाला. माझ्या वर आरोप झाले त्याबद्दल माहीत नाही, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर अनिल परब यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब म्हणाले, “रमेश लटके यांच्या निधनानंतर शिवसेनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. अतिशय साधे हे प्रकरण होते. पण ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवू नये म्हणून शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले असल्याचं परब यावेळी म्हणाले. सगळ्या गोष्टी स्पष्ट असताना देखील आम्हाला हायकोर्टात जावं लागल ही दुर्दैवी बाब आहे. एखादी विधवा महिला ज्यावेळी निवडणुकीत उतरते तेव्हा त्यांच्या बाबतीत सहानुभूतीचे धोरण असले पाहीजे. असंही अनिल परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now