मुंबई : ‘द कपिल शर्मा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचे चाहते जगभर आहेत. या शो मधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. हा शो अनेक कलाकारांनी सोडला आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमधून पिंकी बुआ या व्यक्तिरेखेने नावारुपाला आलेली उपासना सिंग हिने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली आहे. नुकतंच तिने मालिका सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
एका मुलाखतीमध्ये उपासना सिंगने सांगितले की, “मला द कपिल शर्मा शो मधून योग्य ते मानधन मिळत होतं. पण काही केल्या समाधान मिळत नव्हते आणि माझ्यासाठी पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे आहे. मला तीच तीच व्यक्तिरेखा साकारण्याचा कंटाळा आला होता. मला त्यात काहीही मजा येत नव्हती.”
दरम्यान उपासना सिंग हिची मासूम ही वेबसीरिज नुकतंच प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये बोमन इराणी आणि समा तिजोरी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर उपासना सिंगची व्यक्तिरेखाही यात खूप महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या या भूमिकेच चाहते कौतुक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<