जिवंतपणी हा दिवस पाहिल हे वाटलं नव्हतं; तृतीयपंथी सोनाली दळवी

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने आज समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे, न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत देशभरातून केले जात आहे, याबाबद्दल बोलताना माझ्या जिवंतपणी हा दिवस पाहिलं असं वाटलं नव्हतं, अशी भावनिक प्रतिक्रिया तृतीयपंथी सोनाली दळवीने दिली आहे.

आजवर देशामध्ये समलैंगिकतेला गुन्हा मानले जात होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ मध्ये बदल करण्याची मागणी केली जात होती. कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे. प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे समलैंगिकांनाही मुलभूत हक्क मिळण्याचा अधिकार असल्याचं यावेळी न्यायालयाने नमूद केले आहे.

आजवर आमच्या समुदायाला समाजात वेगळी वागणूक दिली जात होती, समलैंगिक संबध गुन्हा ठरवलं जात असल्याने कायदेशीर संरक्षण मिळण्यात अडचणी येत होत्या, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आमच्यासाठी भाग्य ऐतिहासिक दिवस आहे. जिवंतपणी हा दिवस पाहिलं हे वाटलं नसल्याचं तृतीयपंथी सोनाली दळवीने सांगितले.