मी काही पाकिस्तानातून आलो नाही : चंद्रकांत पाटलांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा : ” मी काही पाकिस्तानातून आलो नाही, ” या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. “मी पुण्यातून पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदारकी मिळवली आहे. त्या कार्यकाळात अनेक स्थानिक प्रश्न मार्गी लावले आहेत. माझ्या उमेदवारीवरुन खूप चर्चा सुरु आहे. पण मी काही पाकिस्तानातून आलेलो नाही, या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना सुनावलं आहे.

कोथरूडमध्ये दोन दिवसापूर्वी आयोजित प्रचारसभेत त्यांनी पाटील यांचावर बाहेरच उमेदवार म्हणून टीका केली होती. ” कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला कारण तुम्हाला गृहित धरलं जात आहे. आम्ही कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल, हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं राहायला तुम्हाला भीती का वाटली? अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली होती.

दरम्यान, पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीच्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी तसेच आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या :