जाणून घ्या शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी केलेला फोन का आहे चर्चेत ?

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या निवडणुकीत ईडीचा मुद्दा देखील मोठ्याप्रमाणावर चर्चेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे याच मुद्द्याचे जोरदार भांडवल करत असल्याचे दिसून येत आहेत.

नुकताच मला ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका असं सांगण्यासाठी सरकारच्यावतीने फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं नका असं करु, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. या पवारांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पवारांनी केलेल्या या दाव्यावर आता फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. पवारांनी केलेला दावा हा खोटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मी जर तोंड उघडलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

“हे धादांत असत्य, खोटं आहे. शंभर टक्के खोटं आहे. मी कधीही पवारसाहेबांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. काही फोन मला आले, त्याबद्दल जर मी सांगितलं, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण मी काही राजकीय औचित्य पाळणाऱ्यांपैकी, राजकीय नीतीमत्ता पाळणाऱ्यांपैकी आहे. म्हणून त्याबद्दल मी सांगणार नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही. पण मी कधीही पवारसाहेबांना फोन केला नाही की तुम्ही जाऊ नका”

महत्वाच्या बातम्या