मी हात पुढे केला होता, पण त्यांनी हाताला गुदगुदल्या केल्या : राज ठाकरे

raj thakrey

मुंबई : दोन ठाकरे बंधु एकत्र येण्यात कुणाचा अडथळा? – परमेश्वरालाच ठाऊक अस म्हणत राज ठाकरे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य केल आहे. त्यांनतर टाळी देण्यासाठी मी हात पुढे केला होता, पण त्यांनी हाताला गुदगुदल्या केल्या अशी मिश्कील टिपण्णी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.

ब्राम्हण सेवा मंडळाकडून दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखती वेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना राज यांनी अनेक मुद्यांना हात घातला. भाजप शिवसेनेला किंमत देत नाही हे त्यांना कळायला हव अशी टीका त्यांनी शिवसेनेव केली.

वाचा राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीतील मुद्दे
दुसऱ्यांना संपवण्यासाठी जिवंत राहण्यात काही अर्थ नाही.
दोन ठाकरे बंधु एकत्र येण्यात कुणाचा अडथळा? – परमेश्वरालाच ठाऊक.
मी हात पुढे केला होता, पण हाताला गुदगुदल्या केल्या.
जाहीर न केलेली आणीबाणी देशात दिसतेय… आज इंदिरा गांधीची भूमिका भाजपला पटलेली दिसतेय.
सत्ता टिकवण्यासाठी चुकीचे पायंडे तर पाडत नाहीत ना? याची खबरदारी राजकीय पक्षांनी घ्यायला हवी.
राज ठाकरे सध्या काय करतात? – पक्षबांधणी
राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जेव्हापर्यंत जीवंत आहे तेव्हापर्यंत भाजप जिवंत आहे.
बाहेरच्या लोंढ्यांमुळे शहर बकाल.
आजोबा सांगायचे, बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत बसावं… आणि बाहेर शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करावं.
किरीट सोमय्या आता का व्होटिंग मशीनबद्दल बोलत नाही?
कोणी काय खावं हे सरकारने किंवा इतर कोणीही ठरवू नये.
पर्युषण आहे म्हणून कत्तलखाने बंद करणं हे चुकीचं.
भाजप शिवसेनेला किंमत देत नाही हे शिवसेनेला कळायला हवं.
बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत, त्याची प्रकृती उत्तम आहे.
माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात.
आरक्षणाची गरजच नाही, जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला आरक्षण द्या.
महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नोकऱ्यांत मराठी मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही.
घरी गणपती आणण्याची प्रथा फार पूर्वी कोकणात होती पेशव्यांच्या सोबतीनं ही प्रथा घाटावर आली.
त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरु केला.
महापुरुष जातीमध्ये विभागले गेले आहेत, आता देवही जातीमध्ये विभागले जात आहेत.
परप्रांतीयांचे लोंढे थांबवायला हवे आहेत.
मोदींनी आधी मनपा, मंत्रालयातील साफसफाई करावी.
पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं.
बाहेरच्या लोंढ्यांनी मुंबई अधिक बकाल झाली.
टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली.
संघटना बांधणीत मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे.
‘श्रीमंत असणं हा गुजराती समाजाचा डीएनए’ चांगला व्यवसाय करणं हे त्यांच्यामध्ये आहेच.
मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोक भाबडे होते’ बाकी इतरांना राजकारण करायचंय.
पक्षात जात पाहून तिकीट देत नाही – राज ठाकरे ‘मात्र जातीची आरक्षणं असतात तेव्हा माणसं शोधावी लागतात’
मेट्रो नक्की कुणासाठी होतेय? राज ठाकरेंचा सवाल ‘मुंबईतल्या लोकांसाठी की बाहेरून येणाऱ्या लोंढ्यासाठी’