fbpx

कोहलीने मला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो : कुलदीप

टीम महाराष्ट्र देशा- कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करताना मला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी यशस्वी होऊ शकलो, असे मत भारताचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले आहे.

“कर्णधाराने तुम्हाला कायम पाठिंबा द्यायला हवा. त्याने तुमच्यात असलेली प्रतिभा ओळखायला हवी आणि त्यानुसार कामगिरी करण्यासाठी गोलंदाजाला प्रेरणा द्यायला हवी. जर कर्णधाराने आम्हाला मैदानावर गोलंदाजी करताना स्वातंत्र्य दिले नाही, तर मात्र गोलंदाजाला यशस्वी होणे शक्य नाही.”, असे कुलदीप म्हणाला.

पुढे बोलताना कुलदीप म्हणाला,आता एक गोलंदाज म्हणून प्रगल्भ होत आहे. आयपीएलच्या कामगिरीचा कुठलाही परिणाम वर्ल्ड कपवर होऊ देणार नाही.’ टी-२० क्रिकेटमध्ये एखादा दिवस वाइट जातो. मी काही जादूगर नाही की प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करील. तुम्ही असे सांगू शकत नाही, की तुम्ही अधिक विकेट घेणार, असेही कुलदीपने सांगितले.