त्यांना मी पाकिस्तानीच समजतो- भाजप आमदार

भाजप

बालिया: उत्तर प्रदेशमधील बैरिया येथे झालेल्या एका सभेदरम्यान भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी ‘भारत माती की जय’ असं बोलण्यास जे नकार देतात, त्यांना मी पाकिस्तानीच समजतो, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले, जे लोक मातृभूमीमध्ये जन्म घेऊन देखील देशाला आईसमान मानण्यास नकार देतात त्यांच्या राष्ट्रभक्तीवर मला संशय आहे. तसेच जे लोक भारतमातेला ‘डायन’ संबोधतात त्यांचा लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेण्यात यावा. तसेच २०२४ पर्यंत हा देश हिंदू राष्ट्र बनेल. असेही ते म्हणाले.